Wednesday, March 20, 2019

नाहीतर इतिहासात "लखोबा" म्हणून आपली नोंद होते..*


श्रेष्ठ कोण : *व्यक्ती की संघटना*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी *ग्रामगीता*  या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात,
*"हत्तीस आवरी गवती दोर ! मुंग्याही सर्पास करती जर्जर !! रानकुत्रे संघटोनी हुशार ! व्याघ्रसिंहासी फाडती !!*

यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात.समाजात (समूह) राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो.त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते.जो माणूस समाशील नसतो तो कितीही बुद्धिवान, पैसेवान असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे समाजाला त्याचा उपयोग होत नाही. *म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.*
जी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जुळलेली असते त्या त्या व्यक्तींना लोक ओळखत असतात. इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळत असतो. काही व्यक्ती संघटनेत खूप 'Active' असतात. त्यांना जास्त प्रसिध्दी मिळते. संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली, नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते. त्यांना प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पद, पत, मिळायला लागते. *काही लोकांच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते.ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात.* त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. माझ्यामुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते. *मीच या संघटनेला मोठे केले असा अहंगंड त्याच्यात निर्माण होतो.* मग त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, चालणे पूर्णपणे बदलून जाते. ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो "मोठा" झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो. त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो. त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो. आता त्याचे "attitude" पूर्णतः बदललेले असते. *आणि इथूनच मग त्याच्या -हासाला सुरुवात होते.* जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते. संघटनेत काही वक्ते, लेखक, प्रचारक असतात. त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात. वक्ते, लेखक हे संघटनेचे वैभव असतात. परंतु कार्यकर्ता मात्र संघटनेचा प्राण असतो, आत्मा असतो. त्यामुळे "या" मंडळींपेक्षा कार्यकर्ता अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून एखादा वक्ता किंवा लेखक याला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त महत्व देवू नये. सर्वांना महत्व दिल्या गेले पाहिजे. नाहीतर "ही" मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात. *मग आता त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते.* तो आता मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आता आपण या *संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा त्याचा भ्रम होतो.* मग तो संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो, बोलायला लागतो, कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतो, कार्यकर्त्यांना नेतृत्वाविरुध्द खोटेनाटे सांगतो आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु कार्यकर्ते हुशार आणि निष्ठावंत असल्यामुळे त्याच्या कारस्थानाला बळी पडत नाही. उलट कार्यकर्ते त्यालाच जाब विचारतात. *संघटनेने मोठे केले नसते तर तुला गावाच्या बाहेर कोणीही ओळखले नसते* असे त्याला अधिकारवाणीने सांगतात. आतापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली इज्जत "zero" होवून जाते. मागे वळून पाहिल्यावर त्याच्यामागे कोणीच दिसत नाही. मग त्याचे डोळे उघडते,पश्चात्ताप होतो, संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण होतो याची त्याला जाणीव होते. पण आता वेळ निघून गेलेली असते. काही क्षणासाठी मोठे लोक सोबत असतात पण आपले संरक्षण करणारा, आपल्यासाठी जीव देणारा कोणीच जीवाभावाचा सामान्य कार्यकर्ता मात्र आपल्यासोबत नाही याची त्याला जाणीव झाल्यावर त्याची रात्रीची झोप हराम होवून जाते. तो एकाकी पडतो. पैसे कितीही मिळाले तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला कधीच मिळू शकत नाही. पण *जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते.* "फितुर" म्हणून त्याला कोणीही हिणवत नाही. प्रामाणिक म्हणूनच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. *म्हणून कोणत्याही संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे.* संघटनेत रुसवे, फुगवे, नाराजी, वादविवाद चालतच असतात.पण ज्या *संघटनेमुळे आपल्याला "सर्वकाही" मिळाले त्याच्यासोबत मात्र कधीच धोकेबाजी करु नये.नाहीतर इतिहासात "लखोबा" म्हणून आपली नोंद होते..*

Sunday, February 17, 2019

पाकिस्तान नसता तर देशप्रेम?? --२

पुलवामा दाहशतकांड झालं आणि पुन्हा सारे fb वर देशप्रेमी जागे झाले,,
मग काय भारतीय सैनिकांनी लाहोर मध्ये घुसल पाहिजे ,त्याचे संबन्ध तोडले पाहिजेत,,, अरे हो हो परंतु ही मानसिकता तुमच्यात आहे काय??
देशासाठी प्राणत्याग वैगेरे ह्या लांबच्या गोष्टी परंतु
उद्या युद्ध करायचंच झालं तर ते सोसायची तयारी आहे का? त्यातून पंतप्रधान हा निर्णय घेणार का?
त्यांना निवडणुकीचा अश्वमेध जिंकण्या पलीकडे काही सुचत नाही,, 5 वर्ष दिली अजून आजन्म मीच मीच आणि मीच पर्याय आहे  का?
अरे तुम्ही पर्याय नाही तुमची अगतिकता दर्शवताय हे कळत नाही का आम्हला???
आणि नेमकं या उलट,, साधारण आज 15/16 वर्ष झाली अमेरिकेच्या ट्विन टॉवर्स वर हल्ला झाला
आणि आंतरराष्ट्रीय कायदा मोडत ओसामा बिन खदेडून काढला मारला ,,, पुन्हा गेल्या 15 वर्षात अमेरिकेवर मुस्लिम हल्ला झाल्याचं ऐकीवात नाही
कारण देशाच्या जनतेला काय हवं ते तिथला पंतप्रधान जाणतो,, विकासाच्या भूलथापा नन्तर
,,, अमेरिकेवर हल्ला झाला त्यावेळी त्यांनी विचार केला की अरे आमच्या कडे काही हिंदू मुस्लिम पारंपरिक झगडा नाही,हिंदुस्थान पाकिस्तान असे दोन तुकडे नाहीत, आमच्या कडे कुठे 370 नाही,
आम्हला कुठे बाबरी पाडून राम मंदिर बांधायचं नाही, आमच्या कडे हिंदूंना एक मुस्लिमांना एक कायदा नाही, हम दो हमारे 25 ला मुभा नाही,
सर्वांना एकच एक समान नागरी कायदा आणि त्यातही झुकत माप द्यायचं झालं तर आधी मूळ अमेरिकन्स नन्तर ग्रीन कार्ड आणि मग इतर,,
आशा अमेरिकेवर हल्ला झाला त्यावेळी त्यांनी मग रीतसर सगळी माहिती काढली त्यात त्यांनाअस कळलं की रशिया आणि अगगणिस्तान यांच्यात वारंवार झगडे सर्वात जास्त होतात मग त्यांनी रितसर पगार देत रशियाचे रिटायर्ड आणि kgb चे लष्करी अधिकारी यांच्याशी सल्ला मसलत केली की तुम्ही या सगळ्या गोष्टीला कस तोंड देता???
आता आम्ही त्यांच्याशी कस डिल करू?
काय बोलू? काय वाटाघाटी करू? त्यांच्या मागण्या काय?
त्यावेळी त्यांनी सांगितलं की
त्यांची स्वतःची अशी कुठलीही राजकीय मागणी नाही मुस्लिमांना केवळ तुमच्याच देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर इस्लामच राज्य आणायचं आहे
तेव्हा तुम्ही आधी लक्षात घ्या,,,,
आणि मग अमेरिकेने काय केलं ते सार जग जाणत,,,
ही जी अमेरिकेची मानसिकता, तेथील जनतेची मागणी पुरवणारा पंतप्रधान, आम्ही कुठून आणणार आहोत,,,
क्रमशः,,,,

Saturday, February 16, 2019

पाकिस्तान नसता तर तुझं देशप्रेम ?---१

काल एका मित्राने सहजच प्रश्न विचारला की पाकिस्तान नसता तर तुझं देशप्रेम तेव्हडच असत का जितकं आज आहे????
मी देखील सहज त्याला सांगितलं देशभक्ती दाखवण्यासाठी पाकिस्तान असण्याची काय गरज ती अशीही माझ्यात असतीच,,,,
परंतु त्याच्या प्रश्नात खोच होती,,,
की आपण मुसलमान म्हंटल की चवताळून उठतो , उठत असतो,,
पण खरच मनापासून कुणीही उत्तर द्यावं
एक साधा दळणाचा डब्बा कधी आईने बायकोने आणायला सांगितला तर चार जिने चढून जाताना किती दमछाक होते????
आपल्यासाठी ते खूप अवघड काम असत
नाईलाजाने करतो देखील मग झोपताना मस्त पैकी बायको कडून कम्बर दाबून घेतो,,
एखादा स्टूल फ
घेऊन माळ्यावरच एखादं सामान आपण नीट काढू शकत नाही आणि पाकिस्तान मध्ये घुसून राडा करायच्या गोष्टी करत असतो,,
किती सक्षम आहोत आपण???
किमान 5 किलो सामान घेऊन आपण 5 km धावत किंवा चालत जाऊ शकत नाही देशप्रेम हे फक्त
लांडयांना शिव्या देण्यापूरत,,
आणि ते देशप्रेम तसच राहावं याची खबरदारी सरकार योग्य रित्या घेत असत
कारण आपण सारे आज गुगलाधीन गुगलेश्वर झालो आहोत एप वर जगणारे आपण,,
सरकारे सुविधा पुरवत आपल्याला पंगू केलंय हे आपल्या गावी ही नसत
तरीही आम्ही इतके हापालेले की अजून विकास हवाच असतो,,, अरे बाबांनो विकासाचा भसम्या
झालाय रे वेळीच आवरा स्वतःला एप मुळे सतत कुणी तरी दुसर्याने आपल्यासाठी राबवा ही मानसिकता तयार केलीय सरकारने
राशनच्या काय आता पैशांच्या रांगेत उभे राहिलो तरी जीव जातो आपला,, बाबांनो पंगू केलंय सरकारने आधी आहे ते नीट सांभाळा त्याचा नीट सांभाळ करा मग हवं तर पुलावर पूल नन्तर बांधा,,
पण आधी
प्रत्यक्ष किमान स्वतःचा जीववाचण्यासाठी सलग 5 km धावू शकत नाही तिथेच देशाला अर्पण वैगेरे च्या पोस्ट ,, आता लाहोर पार चलो , दुष्मन को खदेड दो वैग्रे वैग्रे,,,, नका रे टाकू
Fb हे संपर्काच साधन आहे साध्य नाही हे कळलं तरी पुरेसे आहे
बाकी राग येणं हे साहजिकच परंतु तो राग पाळा सांभाळा तो व्यक्त करण्या आधी किमान
रोज 10 सूर्यनमस्कार 10 बैठका आज आत्ता पासून मारायला सुरवात करा आधी किमान 1 km नन्तर 10/20 km जे जस धावता येईल तस धावायला सुरवात करा,,
कुठली तरी निशस्त्र युद्धकला शिका, रायफल शूटिंग शिका, मुष्टि युद्ध, कराटे, जुडो काही तरी शिका
किमान अर्धा तास व्यायामाला द्या,
आणि हो आधी देवा धर्मावर विश्वास ठेवा जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चितच असतो या श्रीकृष्ण वचनावर विश्वास ठेवा बघा लाहोर काय पुन्हा अटक पार जरीपटका फडकल्याशिवाय राहणार नाही,,
क्रमशः,,,,,,,

Friday, January 25, 2019

दुधा ऐवजी ताक हेच दूध आहे मानण्याचा नमो मार्ग

||श्री नथुरामाय नमः ||

समर्थ म्हणतात
*||बाहेर लंगोट बंद काये| आंत माकड छंद काये||*
अर्थ,,,,
*जे आपल्या उद्दिष्टां शी प्रामाणिक नसतात जे आत एक आणि बाहेर एक अस वागतात म्हणजे बाहेर दाखवायचं ब्रम्हचर्य आणि मनातील विचार वेगळेच,,*
म्हणजेच बोले तैसा चाले
अस ज्यांचं वर्तन नाही त्यांच्या साठी हि सणसणीत चपराक आहे,,
आज प्रजासत्ताक साजरा करताना तो ही 56 इंचच्या साक्षीने साजरा करताना मनात विचार आला की होय मी खरच या प्रजासत्ताक देशात राहतो
या देशाचा नागरिक म्हणून हिंदूंना काँग्रेस राजवटीत जे जे मिळालं नाही ते ते सार मिळालं करूया,,
आपल्याला मिळालेलच अशी समजूत करून आंनदी राहण्याचा तो ताकाला दूध मानण्याचा
*एक नमोमय मार्ग आहे*

मग चला या मार्गावर सुरवात करू
चालायला कारण हे रोज करायचं असत एक दिवस फोटूकाढून घेण्या साठी करायचा नसतो
मग चला म्हणा बघू,,,
नमस्ते सदा,,,जयतू जयतु हिंदू
तेव्हा आपण सारयांनी आता अशी समजुत करून घेवून नव्हे ते आलच आहे कि,,,
राम मन्दिर झालंच आहे,
370 रद्द झालंच आहे,
समान नागरी कायदा पास झालाच आहे,
आरक्षण रद्द झालंच आहे,
कश्मीर वर आपली निरंकुश सत्ता आहेच,
पाकव्याप्त असले काहीही नाही,
देशातील सारे नागरिक हे हिंदू म्हणूनच ओळखले जातात,
देशभरात कुठेही कुठल्याही जाती धर्माचे पॉकेट्स नाहीत,
निवडणुका केवळ मतांच्या लाचारी साठी जातच नाहीत,
धर्माच्या जातीच्या आधारे कुणाला हि सवलती दिल्या जात नाहीत,
अल्पसंख्य म्हणून कुणाचे हि लाड केले जात नाहीत,
देशाचा तिरंगा जाऊन तिथे भगवा हाती घेतला गेला आहे,

आणि हो हे देखील पटवून घ्या,,,
देशाच्या अस्मितेपेक्षा विकास
महत्वाचा मग तो विकास भले
बाळाला बाटलीचे दूध पाजून आलेली सूज असेल,, बाळसं धरण्यासाठी आईचंच दूध लागत
त्यामुळे देशाचं संरक्षण जग फिरूनच होणार हे हि मान्य करून घ्याच मग भले हि अंतर्गत शत्रू हे देशद्रोही असले तरी चालतील ते कितीही इसिस मध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रचं शिक्षण देत असतील पण आम्ही मात्र *आमचा शांती मार्ग नाही सोडणार अहो तो तर प्रातःसमर्णिय आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

*काँग्रेसी रचिला पाया भाजप चढवतसे कळस*

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला परन्तु राज्य कस करायचं हे ठरवलं गेलं 26 जानेवारी1950 दिवशी या देशातील प्रत्येक नागरिक हा मतदार राजा म्हणून घोषित झाला इथे राजा आपल्या वतीने एक प्रतिनिधी निवडून देतो राज्य कारभार चालवण्यासाठी परन्तु,,,
 हा असा देश आहे जिथे,,
*बहुसंख्यांकांच्या मतावर निवडणूक तर लढवली जिंकली जाते परन्तु देशाचा कारभार मात्र अल्पसंख्यांच्या मतांवर केला जातो,,,*
गेली कित्येक वर्षे बहुसंख्य असूनही
आरक्षण रद्द करू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,
370 कलम रद्द करू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,,
समान नागरी कायदा राबवू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,,
पाकिस्तानशी दोन हात करू शकत नाही कारण अल्पसंख्य मत,,
*बाकी हिंदू हिंदुत्व घाला चुलीत त्याच नाव काढलं तर तुम्ही देशद्रोहीच जिथे ठरवले जाता असा देश*
शिवरायांच्या नंतर पुन्हा एकदा गुलामगिरीत गेलेला हा मतदार राजा आज अशा एका देशात राहतो ज्याला *आझाद देश के गुलाम* म्हणवून घ्यायला खूप आनंद वाटतो
 आशा सर्व गुलामांना तथाकथित प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या मनःपूर्वक शुभेच्छा
ज्ञानदेवे रचिला,,,,च्या चालीवर म्हणाव वाटत
*काँग्रेसी रचिला पाया भाजप चढवतसे कळस*
, भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Thursday, January 3, 2019

आमचं पुणे आमचं डोकं आम्ही ठरवू,,,


आमचं पुणे आमचं डोकं आम्ही ठरवू,,
31 dec आणि नववर्ष साजरं करण्यासाठी कुणाच्या तरी डोक्यातून हेल्मेट सक्तीची सुपीक कल्पना निघाली आणि पुण्यात जाळ आणि धूर संगटच निघाला,,
खर तर आमचं डोकं वाचवायची आम्हला गरज वाटत नाही का?
आणि हेल्मेट घालून खरच जीव वाचणार याची कुणी तरी शास्वती देणार आहे का?
आज अपघात झाल्या नन्तर असे बरेचदा अक्षरशः हेल्मेट कापून ओळख पटवून घ्यावी लागली आहे पुणेच काय कुठलेही पोलीस यावर नक्कीच बोलतील,,
अशी अनेक कारण आहेत ज्यात मागचं पुढचं नीट दिसत नीट ऐकू येत नाही मानेवर वजन केस खराब इतर अशी बरीच,,, तरीही सरकार हेल्मेट सक्ती करते का???😏😏😠😠
मुळात आज हेल्मेट घालावी अशी सक्ती का करावी लागते???
इथेच खरी गोम आहे
सरकारने ज्यांची लायकी नाही सायकल घ्यायची अशांना आधी 1000/500 शेत मोटरसायकल देणं
O% व्याजावर गाड्या देणं बंद केलं पाहिजे,,
जो एकरकमी पैसे भरेल त्यालाच गाडी,,
ज्याच्याकडे स्वतःच पार्किंग घराच्या आजूबाजूस असेल त्यालाच गाडी द्यावी,,
पंपावर किमान 100 रु पेट्रोल मिळेल अशीच व्यवस्था करावी,,,
अगदी हेच चार चाकी गाड्यां बाबत ही करावं
कशाला एका माणसाकडे चार गाड्या?
माझ्या स्वतः कडे 6 हेल्मेट आहेत पण मी स्वतः हेल्मेट विरोधी आहे
आम्हला कळत नाही का गाडी कशी चालवावी?
स्वतःचा जीव कसा वाचवावा?
त्या पेक्षा रस्ते सुंदर करायचं काम करा फक्त उड्डाणपूल बांधून वाहतुकीची समस्या अपघाताची समस्या सुटणार आहे का????😏😏😠😠
आशा तर्हेने लोकांकडे मुळात गाड्याच कमी असतील तर लोक सार्वजनिक वाहन जास्त वापरतील त्यातून सारकरचाच महसूल वाढेल ,,
*महसूल वाढला तर अर्थातच सरकार आणि पर्यायाने जनतेलाच फायदा होईल*
त्यामुळे Gst सारखे टॅक्स न लावून लोकांच्या मनात सरकार विरोधी असंतोष ही कमीच होईल,,,
परंतु सरकार काम अस करत कीआधी ते
*जनतेला व्यसन लावत आणि मग औषध घ्या म्हणून जबरदस्ती करत* जे अत्यन्त चूक आहे
कुणा शेटजींच्या तिजोर्या भरण्या ऐवजी जनतेचा दुवा घ्यावा सरकारचा फायदा हा ठरलेला
*उगाच शिस्तीच्या नावाखाली शेटजींच्या तिजोर्या भरायचं पापकर्म करू नका*
*स्वाअनुभव हाच सगळ्यात मोठा गुरू आहे*
*आम्ही पुणेकर अस कुणालाही डोक्यावर बसवून घेत नाही आणि हेल्मेट तर नाहीच नाही*

Saturday, December 15, 2018

शहरयार ,आणि मोदीजी


हारयार--टोपण नाव खर नाव कुंवर अखलाख खान पण उमराव जान सिनेमा मुळे परिचित असलेले त्यांचं पुस्तक अ लाईफ इन पोयट्री
प्रकाशित झालय
अत्यन्त शांत संयत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व
शिक्षकी पेशात असताना त्यांनी म्हणे
राजेंद्रसिंह बेदी यांची एक कथा *#अपना दुख मुझे दे दो* शिकवायला 15 दिवस घेतले जोते वाक्य न वाक्य मुलांनी वाचून त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असे,,
असे हे शहरयार शायर आपल्या कवितेतून
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात संयत परंतु तितक्याच कठोरपणे
*तुम्हारे शहर मे कुछ हुवा नही क्या?*
*की चिखों को सचमूच तुमने सुना ही नही?*
*मै एक जमाने से हू हैरान की हकीम-ए-शहर*
(शहराचा मुख्य नेता)
*जो हो रहा है उसे देखा ही नही क्या?*
यांची मनाला अस्वस्थ करणारी कविता वाचल्यावर

मा.श्री नरेंद्र मोदी साहेब
कालच्या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव
पाहता तुम्हला खरच कशाची ही जाणीव नाही का?
मोदी तुम्ही आणि तुमच्या बगलबच्यांनी खरच आपल मन, मेंदू, हिंदुत्व, हे झापडबंद करून तर ठेवलं नाही ना???
हकीम-ए-शहर (देशाचा नेता) खरच तुम्हला कळत नाही का हिंदूंनी तुम्हला मतदान नक्की का केलं होत?
गेली अनेक वर्षे मुस्लिम लांगुलचालना वैतागलेले,
देशावर पाकिस्तान कडून होणाऱ्या हल्ल्याला वैतागलेले,
370 कलम रद्द करण्यासाठीच निवडून दिल होत ना?
बाबराने बळजबरीने मंदिराची मशीद केल्या जन्मभूमी मंदिरासाठीच तर मतदान केलं होत ना?
समान नागरी कायदा, 56 इंच का सीना, काळा पैसा हे सगळं लक्षात आहे ना???
सत्तेत आल्या नन्तर जर तुम्ही याकडे सोयीस्कर डोळेझाक करणार असाल तर पप्पू काँग्रेस पुन्हा पंतप्रधान पदी बसल्यास हिंदूंना दोष देऊ नका
नोटा आणि हातून गेलेली राज्ये का गेली हे समजून घ्या यालाच जन आक्रोश अस म्हणतात आणि तुमच्या सारख्या नेत्याला तो कळायला हव
खोटे व्हिडीओ खोट्या बातम्या आयटी सेलचा प्रचार यातून क्षिणक सुख मिळेलही कदाचित
परंतु हिंदुहृदयसम्राट नाही बनणार तुम्ही
त्यामुळे वरील प्रश्नांची खरीखुरी तुम्ही दिली नाहीत तर प्रत्येक हिंदू,,,
वेताळ जस राजा विक्रमादित्यला ( तुम्ही तर श्रीविष्णूचा अवतार) विचारतो
राजा खर खर उत्तर दे नाही तर तुझ्याच डोक्याची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेतील
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक


Monday, November 12, 2018

8 नोव्हेंबर चे ठग्स


8 नोव्हेंबर चे ठग्स ऑफ हिंदुस्थान

केवळ आणि निव्वळ सत्तेच्या हव्यासापायी अर्थकारण कसे आणि किती वेठीला धरले जाते याचा उत्तम नमुना म्हणून नोटबंदित नोट बदली कशी योग्य होती हे बोकील आणि भक्तांच्या तोंडून
ऐकलं की एका अतार्किक निर्णयाची नोंद इतिहासाला करावी लागेल हे लक्षात येत
पूर्वी अकबराच्या दरबारी जो चतुर बिरबल च्या नावाने प्रसिद्द असलेलाच आज पुन्हा भक्तांच्या रूपाने जन्माला आला आहे
बादशहा कसा खूष होईल हेच त्याच ध्येय होत
आज ही आहे
अशाच या नव्या अकबराच्या दरबारात घडलेली गोष्ट,,,
नेहमी प्रमाणे लहरी अकबरला स्वप्न पडत
की राज्यात जमा होणारा कर रुपी पैसा हा तिजोरीत जमा होतो पण जनते पर्यंत पोहचत नाही
मी तर जनते पर्यंत पोहचवतो पण जातो कुठे कळत नाही????
जबाबदारी अर्थातच बिरबलावर येते
मग बिरबल राजाला भर दरबारात प्रात्यक्षिक करवून समजावतो
सगळे अकबराचे मित्र व्यवसायिक त्यांना बोलावतो दरबार सुरू होतो तसा बिरबल
एक 5 किलोचा बर्फाचा गोळा मागवतो
दरबारात मग प्रथम मल्ल्या अंबानी अदानी अस एक एक करत तो बर्फाचा गोळा बादशाह हातात येतो तेव्हा तो एक किलोचा झालेला असतो
मग बिरबल दुसरा प्रयोग राबवतो
आता तो पुन्हा 5 किलोचा बर्फाचा गोळा बादशहा च्या हाती सोपवतो आणि सांगतो आता तो जनतेच्या हाती सोपवा
बादशहा अर्थातच आधी मल्ल्या अदानी अंबानी च्या हाती सोपवतो जनते पर्यंत जाण्यासाठी
आणि जनतेच्या प्रतिनिधींच्या हाती जेव्हा तो बर्फाचा गोळा पडतो तेव्हा जवळ पास 5 किलोचा बर्फ केवळ 100 gm उरलेला असतो,,,
त्यावर बिरबल सफाई देतो
बघा बादशहा
सगळे किती प्रामाणिक आहेत
कुणीही काही घेतलं नाही कुणीही काही खाल्लं नाही कुणी काही लपवल नाही तरीही
बर्फ कमी झालाच ना? कारभार हा असाच असतो
असाच होतो कुणीही  दोषी नाही
तात्पर्य--- आजचे हे बिरबल त्या बिरबल पेक्षा ही चतुर आहेत जो तळ राखी तो पाणी चाखी हे ते जाणून बुजून विसरतात बर्फ हाताळताना त्या प्रत्येकाच्या हाताला पाणी लागलेलंच असत ते अत्यन्त चतुरपणे लपवतात
पण कितीही लपवल तरी जो बंद से गयी वो हौद से नही आने वाली

Saturday, November 10, 2018

मोदी साहेब अहो हे प्रसिद्धी च विमान जरा आमच्या दारात येवू दे आमचा ही फोटू पेपरात

आ.मा.
भारतगुजरात सरकारचे
पंत प्रधान
श्री श्रीमान मोदी साहेब

येक डाव परसीदीच इमान
आमच्या दारात झुलू दया

ऐरण की करे चोरी
और
सूई का करे दान
अब देखत है राह कब आये विमान -संत कबीर
अर्थ--खुप मोठ्या मोठ्या चोर्या करायच्या आणि खुप मोठ पुन्य करतोय या अविर्भावात सुइच्या आकाराची वस्तु दान करायची आणि म्हातारपणी वाट पहायची की देव आता मला न्यायला विमान पाठ्वेल कारण
दान करून मी पुण्य कर्म केल आहे
पण हे उदा.खोट आहे की
काय अस वाटू लागलय
कारण वयाच्या 15 वर्षा पासून
मी जिथे राहतो तिथे
मी स्वता झाड़ू मारून आजुबाजुचा परिसर माझ्या परीने स्वच्छ ठेवतो
आणि माझ सोडा हो
संतश्रेष्ठ गाडगे बाबा आयुष्यभर
झाडू मारत जगले
स्वछ्तेतच देव आहे हे ते आयुष्यभर सांगत होते
गांधी बाबा हे स्वछ्तेचे भोकते होते आज आपना सर्वाना माहीत असलेले
श्री प्रकाश बाबा आमटे
यांचे वडिल यानीही गाँधीन कडून स्वछ्तेची प्रेरणा घेत आनंदवन उभारल
आज त्यांची नातवंड ही
हे स्वछ्तेच काम हाती घेवुन फिरत आहेत
पण काल कुठे मोदीने झाड़ू मारला आणि लोकांना आवाहन केल
झाल सचिन सकट सारे सेलिब्रेटी सक्काळी सक्काळी
उठून झाड़ू मारू लागले
आणि या मुडिया वाल्यांना काय झोपा येतात की नाही माहीत नाही सक्काळी सक्काळी हे ही हजर त्यांचे फोटू काढायला
मी माझा उल्लेख अशा साठी
केला मोदी साहेब
अहो हे प्रसिद्धी च विमान
जरा आमच्या दारात येवू दे
आमचा ही फोटू पेपरात
झळकू दे तस आमीबी छान दिसतु एवड बी वाईट वांगाड नाय दिसत...
आन हो आणि आणखी येक़
इंति हाय मोदी सायेब
कारण संघाचे हात म्हणून ..
एक इंति हाय समद्यास्नी
स्वछ्तेचे महत्व पटवून दिलत
त्यासाठी गंगा किनारी
जावून स्वता हातात फावड़ा घेलात
..
अता इरोधक हलकटच वो त्यानी लगेच बोलले हे रात्रि कचरा टाकतात आणि सकाळी जावून उच्लतात ..
पण तुमि नका लक्ष देवू
फकस्त एक इंति हाय
लोकास्नी जसा जसा झाड़ू उचलायला सांगितला आणि लोकानी (शेलिब्रेटी)लगेच
उचलला सुधा आन सावरकरांच तर सपान हाय परतेक घरात किमान येक सैनिक झाला पायजेल
मोदी सायेब तुमच्या मुळ फकस्त तुमच्यामुळ लोकांना स्वाच्छतेच महत्त्व कळल हाय
जरा ज्या हातांना झाड़ू उचलायला सांगितला त्याना जरा बंदुका बी उचलायला सांगा
लय गरज हाय वो त्याची
आपला
सलग 36 वर्ष
झाड़ू मारून स्वच्छता राबवनारा
सौनिक शिवसैनिक
भुमकर
सुनील प्रभाकर भुमकर

Friday, November 2, 2018

*पितर सरग भये*---- पितर स्वर्गात गेले असे वाटने***

*पितर सरग भये*----
पितर स्वर्गात गेले असे वाटने***

कंपनी सरकारच्या वेळेची गोष्ट
पलटनीतले शिपाई स्वतः पेज पिउन गोर्या अमलदारांना भात चारित असत
आणि ते टोपडे मर्हाठी शिपायांच्या
त्या आदरातीथ्या बद्दल शिफारसीची पुराणे सांगू लागले
की आमच्या अजागळ पुर्वजान्ना
पितर सरग भये चा हर्षवायु होत असे
तसलाच काहीसा मामला
महारष्ट्र राज्यात सध्या चालु आहे असे दिसते राष्ट्रवाद आणि कोस्मोपोलीटिनीझमची काविळ
झालेल्यांना पांढर पेशा समुहाला हे लक्षात नाही येणार???
देशच्या एकतेच्या अखंडतेच्या गपा इतरांनी माराव्यात आणि महाराष्ट्राने प्रत्यक्ष सहभाग घ्यवा हे ठरलेलच आहे
बंगालची फाळणी झाली
आणि लोकमान्य टिळक महाराज लगेच तिकडे धावले
वंगभंग चा कायदा रद्द करवूनच ते थांबले ...
आणी तोच बंगाल काही दिवसांनी
महाराष्ट्रावर सापासारखा उलटला
 एक दिवस
कुणी तरी कलकत्ता येथील
महाराष्ट्र निवास या इमारतीवर काले निशान लावले
आणि ते निशान जसे लावले गेले
तसेच ते कुणी तरी काढले सुधा
महाराष्ट्र सदना च्या संस्थापकान्ना याची काही कल्पना ही नव्हती...
पण लगेचच त्याचा जाब विचारायला  आले निशान कुणी काढले
पण कुणी
काढले हेच माहीत नव्हते तर ते खुलासा काय करणार
बस्स
बंगाली गुंडांना दंगल माजवायला
इतक कारण पुरेस होत
झाल सदनावर भयंकर दगड फेक झाली खिडक्या काचा फोडल्या
आणि हां सर्व
 *माजवादी राष्ट्रवादी *
मंगल सोहला चालु असता
अचकट विचकट शिव्याचे दान ही  चालु होते
अखेर *इन मराठोको बंगाल से तड़ीपार करेंगे *
असे मंगल दान ही महाराष्ट्राच्या पदरात टाकत होते
*सर्व भारतीय एक* या अनैसर्गिक थोतांडामुले
माराठीच्या थडग्या वर हिंदुत्वाचा
झेंडा उभारल्या मुले
देशावर राज्य करायची ताकद असनार्यांना सुळ आणि उपर्या ना गुळ चारन्यात आपलेच लोक
धन्यता मानतात कारण
बाट्गा हां जास्त कट्टर असतो
कारण या सार्यांची निष्ठा
*छाछोर वारांगनेसारखी आपमतलबी असते*
या सार्यात त्या सैनिकाची अवस्था मात्र
*आपन कुणासाठी कशासाठी हातावर शिर घेवुन लढलो
कुणासाठी पोट बांधून रक्ताच्या रंगपंचम्या खेळलो याच विचार ही चुट पुटु न जात नाही*
कारण त्याच्या स्वाभिमानाचे
तळपट त्याचेचेच मित्र जातभई उडवत असतात
जय श्री राम